Monday, June 04, 2012

गर्दीत हरवलेला मी


गर्दीत हरवलेला मी शोधत राहतो
त्याच गर्दीत सापडशील का तू कुठे?

माझ्या तमाम रातआंधळ्या स्वप्नात
अजूनही वावरते आहेस तू बेधडक
कितीही गुंगीत ठेवलं स्वतःला तरी.

तुझा स्कार्फ, गॉगल, हँडग्लोव्हज
बंदोबस्तासाठी सज्ज असतीलच नखशिखांत.

आणि तरीही
तुझ्या केसांचा, काजळाचा नि तुझ्या आवडीच्या अत्तराचा
एकत्रित वास घेऊन येईल तुला माझ्यापर्यंत.

बस एवढीच एक शेवटची ओळख शिल्लक आहे माझ्याकडे
बाकी तुझाही चेहरा हरवत चाललाय स्मरणातून
माझ्यासारखाच गर्दीत. 

2 comments:

  1. क्या बात है! Perfect dude.

    ReplyDelete
  2. असे हरवलेले किती क्षण आणि किती माणसं .. आणि तरीही आपण उरतोच त्यापल्याड!

    ReplyDelete