एक
आक्राळ विक्राळ
उंच सताड
भले भक्कम
झाड
होतं
झाड पाहून
इंटूकले चिंटूकले पिंटूकले
सब लोग
हबकले
त्तिथेच थबकले
एक जण म्हंटला;
“आम्ही सगळे उंच
झाड पण उंच
मग हे झाड आमचं”
आणखी एक म्हणे;
“झाड असतं निसर्गाचं
आम्हीपण निसर्गाचे म्हणून
हे झाडही आमचेच”
एक जण गरजला;
“याच्याच सावलीत जन्माला आलोय
तुमचा काय संबंध ???
तुम्ही जिथले तिथेच मरा...”
आणिक एक उठला;
“हे झाड हिर्व
माझी त्वचा हिर्वी
झाड माझंच”
त्यातही
एक जण सावधपणे
पडती फळे वेचत राहिला
एक जण कंटाळून
एक जण कंटाळून
रंगीत फुले हूंगत बसला
पुढेशेंड्यापासून बुडख्यापर्यंत
डोक्यापासून चपलेपर्यंत
सगळेजण जमेल तसे
लढ लढ लढू लागले
थकले तेव्हा सगळ्यांनी
थकले तेव्हा सगळ्यांनी
अंग झटकून
वेगळं केलं
तोवर झाड
विद्रुप झालं
काही फांद्या तुटल्या
तर काही सुकल्या
पाने गळून पाचोळली
निकाल काहीच लागला नाही
निकाल काहीच लागला नाही
वाद कधी शमला नाही
पुढे
टूकार वादळ वा-यात
तेच झाड त्याच माणसांवर
उन्मळलं
झाडाखाली
सब लोग
एक गठ्ठा मातीमोल
दिवस सरले
पडल्या खोडाला
पडल्या पडल्याच पालवी फुटली
नवी पालवी नव्या लोकांनी
नवी पालवी नव्या लोकांनी
हूशारीने हेरून ठेवली
या आधीही
असंच झालं असावं
बहूदा
कारण पुढेही ते तसंच चालू राहिलं
आणि पुढेही बहुधा तसच चालू राहील!
ReplyDeleteखरंय कारण याला काही अंत आहे असं वाटत नाही.
ReplyDeletetoo good
ReplyDeleteउत्तम...
समझनेवालोंको इशारा काफी है, पर ना समझनेवालेही जरा ज्यादा है!
पुलेशु
सद्यस्थितीत चालू असलेल्या वादावर स्वयं-विचार मांडण्याचं हे असं एक धारदार हत्यार मानण्यात मला काही वावगं वाटत नाही. या भांडणात त्या झाडाची कदर मात्र कोणालाच नाही, याचं जास्त दुःख आहे.
ReplyDeleteबाकी आपली रचना उत्तम, स्तुत्य.
---
आल्हादच्या प्रतिक्रियेशी सहमत.
आल्हाद @ आभारी !
ReplyDeleteविशाल @ भांडणात त्या झाडाची कदर मात्र कोणालाच नाही, हे खरंच . आपण सगळे आपल्याच झाडाची कत्तल करत बसलोय ही विसंगती आहे. हा इतिहासही आहे. मग इतिहासातून आपण नक्की काय शिकतोय ? प्रश्न बरेच आहेत... आपल्या पातळीवर आपण त्यांची चर्चा आणि फार फार तर लिखाण, इतकाच करतो आहोत. याची खरी उत्तर वेगळीच आहेत हेही जाणवतं. आणि म्हणून यावर फक्त लिहिणं ही पण विसंगतीच ठरतेय.
Kamlesh; aaj pahilyanda visit kartey aani blog sodwat nahiye. khup sundar lihilayas. he saar aahe aksharshah itihaasach. classach.
ReplyDelete