रस्ते बांधले
झाडं कापून
इवल्या पक्षांचं अंगण टाकून
अन् आकाशाला गवसणी घालायला निघालो आपण
किती लोक रस्ता धरतात
सकाळ होता होता
कितीही कोंडी झाली तरी
माणूस कोंडीत सापडत नाही रस्त्यावर
घरच्यासारखा
नि रस्ता मागे खेचत नाही
घरच्यासारखा
हा हा म्हणता
केवढी प्रगती झाली राव
तरी लोक रस्त्यावरच उतरू पाहताहेत
मैदानं सोडून
केवढी प्रगती झाली राव
तरी लोक रस्त्यावरच उतरू पाहताहेत
मैदानं सोडून
मिरवणूका वराती यात्रा अंतयात्रा
मोर्चा दंगली फटाके अश्रूधूर
शतपावली मॅरेथॉन धावपळ
खाणं पिणं थुंकणं
गप्पा टाळ्या कट्टा शिट्ट्या
पेपर बातम्या अफवा
शाळा दुकानं
सगळा संसार थाटला रस्त्यावर
काही संसार रस्त्यावर आले
ते निराळेच
तरी रस्तेच चुकत राहिले नेहमी
माणसांऐवजी
माणसं चुकलीच नाहीत राजे
वर चुकणा-याला रस्ताच दाखवला गेला शेवटी
इतक्या रस्त्यातही रस्तेच
सापडले नाहीत न काहींना
रस्त्यांने देऊ केलाच त्यांनाही एक कोपरा
आणि ज्यांना मिळाले रस्ते ते
रस्त्यावर येईनासे झाले
अजून कितीतरी नवे रस्ते
बांधायचे आहेत म्हणे यंदा
माणस चुकत नाहीत .. रस्ते चुकतात .. हे एकदम आवडल! .. म्हणजे ते खर नाहीये तरी आवडल .. तुम्ही सर्वसामान्य मानसिकता अचूक पकडलीत शब्दांत!
ReplyDeleteनिःशब्द केलंत नेहमीप्रमाणे!
ReplyDeleteit made me remind
ReplyDeleteBilly Joel - We Didn't Start The Fire :)