आता नेमकं सांगता येत नाही की
या खुणा ज्या मी इतक्या आजिजीने
लक्षात ठेवत चाललो आहे त्या
पुन्हा इथे येण्यासाठी की पुन्हा ‘इथे’ न येण्यासाठी..
आता नेमकं म्हणता येत नाही की
या फोफावणाऱ्या पसाऱ्यात
माझ्या एकांताची पांगोपांग होते आहे की तो एकवटतो आहे..
आता नेमकं साधता येत नाही
एकाच वेळी तिचं आणि माझंही भलं
No comments:
Post a Comment