स्वतःच्याच प्रेमात पडतं आकाश
जेव्हा ते पाहतं स्वतःलाच नदीच्या आरसपानी डोहात..
अन नदीलाही होते खुशी..
तरीही म्हणतेच ती लाडिकपणे,
“बाबा रे तूच पाडतोस न पाऊस?”
तेही कुजबुजत सांगतं तिला
“तू आहेस म्हणूनच मला मी पाहू शकतो. अन मी आहे म्हणूनच मी बरसू शकतो.”
-कमलेश कुलकर्णी
No comments:
Post a Comment