Friday, October 15, 2010

लँमिनेट

"आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
असं समजावत
सगळी कातडी
लँमिनेट
करून टाकली
मोठं होईपर्यंत घरातून

बाहेरच्या बाहेर धुता येतील
इतकेच शिंतोडे
उडायला हवेत स्वत:वर
दटावून सांगत राहीले संस्कार

"आपण कसे श्रेष्ठ
आपण कसे उच्च "
अशी वाक्ये
दबक्या आवाजातच
पोहोचली कानात
अन आंबेडकर - फ़ुल्यांवरची भाषणं
ताठ मानेनं चढ्या आवाजात
सांगत
छाती फ़ुगवून घेतली
शाळाभर ...

शेजारच्या मुलाच्या
अंगाचा वासही
वाटायचा जातीय
पण त्याचा पीळदार स्नायू
कुठल्या जातीत राहून तयार झालाय
हे सांगितलं नाही कुणीच

ताटात हात धुतल्यावर
कानशिलात खायचो वडलांची
म्हणायचे, " याद राख पुन्हा
असा अन्नाचा अपमान करशिल तर..."
पण
"चिकन मटण खाणा~या
मुलांच्या बैठकीत बसायचं नाही
खायला शाळेत "
बजावून पाठवायचे
जणू की ते अन्नच नाही।

आता कुणाच्याही
खांद्याला खांदा लावून
काम करतो झकत

पण कातडीवरच्या
या लँमिनेशनपाई
कष्टाच्या घामाचा
अन शरीराचा
खराखुरा वासही
येईनासा झालाय.

10 comments:

 1. सुंदर. अप्रतिम.. खूप आवडली. लॅमिनेशनची उपमा भन्नाट !!!!!!!

  ReplyDelete
 2. "आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
  असं समजावत
  सगळी कातडी
  लँमिनेट
  करून टाकली

  आयच्या गावात!

  ReplyDelete
 3. ही एक खरच धीट कविता आहे. 'बाहेरच्या बाहेर धुता येतील इतकेच शिंतोडे उडायला हवेत स्वत:वर, दटावून सांगत राहिले संस्कार.' ह्या ओळी खाडकन थोबाडीत मारून जातात. माझ्या ब्लॉगवरची एक पोस्ट इथे देतो आहे. जरा समांतर रेषेत आहे म्हणून.

  http://maunachebol.blogspot.com/2009/07/blog-post_25.html

  ReplyDelete
 4. मस्त झालेली आहे ही कविता.

  ReplyDelete
 5. फार तर आपली पुढील पिढी असले व तत्सम् धर्म-कांडाचे गुंतागुंतीचे जाळे घेऊन आपला उद्धार न करोत एवढीच सदिच्छा. "लॅमिनेट" विशेषण खरंच भावलं! पण सगळेच लॅमिनेटेड लोकं तुमच्यासारखे नाहीत, बिगर-लॅमिनेशनवाले देखील त्याला अपवाद नाहीत.

  ReplyDelete
 6. khup Sahiiiii

  bhannnat agadi mantale bhav wyakat keles asa watla......

  ReplyDelete
 7. आयच्चा...! बाप्पा...! लै जबरी...! कमाल!

  ReplyDelete
 8. जबराट .... कानफटात हाणल्ये ........इस थप्पड की गुंज शायद कुछ बदलाव लाये ....

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...