Tuesday, December 07, 2010

प्रपोज

प्रपोज १
"तु मला मित्र म्हणून आवडतोस पण...
मी तुझा त्या दृष्टीनं
कधीच विचार केला नाहीये.
प्लिज राग मानू नकोस "

प्रपोज २
"तुला वाटतं तितकं सोपं नाहीये माझं.
अजून तू माझ्या ताईला आणि बाबांना
ओळखत नाहीस."

प्रपोज ३
"तु चांगला आहेस रे ... पण
माझ्या बाबांनी खूप कष्टात दिवस काढलेत
आता त्यांना आम्हाला सुखी पहायचय...
मी त्यांच्या अगेंस्ट नाही जाऊ शकत."

प्रपोज ४
"थांब. आत्ता नको.
घरात माझ्या लग्नाचा विचार चालू झाला की
मी दुसरं कुठलाही स्थळ बघण्यापूर्वी
तुझंच नाव सुचविन. इतकं नक्की."

प्रपोज ५
"व्वा... आहे का आठवण?
म्हणे लग्न करायचय.
माझी किंमतच नाही तुला.
सारखं काय काम काम काम?
इतका पैसा पैसा केलेलं
मला नाही आवडणार बुवा.

प्रपोज ६
ए एक विचारू ?
- मी का आवडते रे तुला?
- माझ्यासारखीच यापूर्वी कुणी? "

प्रपोज ७
"खोटं खोटं खोटं
सगळ्यांसारखेच आहेत
माझे डोळे माझे केस माझे ओठ
एक सांगू? तू नवरा म्हणून
छान वाटतोस मला."

प्रपोज ८
"ए इतके नॉन-व्हेज मेसेजेस
नको पाठवूस न...
चूकुन बाबांच्या हातात
मोबाईल पडला तर...?"

प्रपोज ९
मला खूप भीती वाटततेय रे ...
नुसत्या एका किसवर थांबणारे का?
पण भेटायचं कुठे?
आणि हो एकच किस हं? प्रॉमिस?

प्रपोज १०
"नको... थांब... प्लिज...बास...
खुप पुढे जाऊ नकोस
भीती वाटतेय...
आई-बाबांना फ़सवतेय असं वाटतय.
ऊं. थॅंक्स. छान वाटतय..."

प्रपोज ११
"आता जरा जपूनच रहावं लागेल.
बाबांना शंका होतीच.
तुझ्याशी काँटॅक्ट तोडायला सांगितलाय.
तुझ्याविषयी सगळी चौकशी केली त्यांनी.
खुप अवघड झाल्यात गोष्टी...
- तु सेटल हो लवकर...
घर, गाडी. म्हंजे मला नीट बोलता येईल."

प्रपोज १२
"आज घरी एकटीच आहे.
लग्नाला गेलेत सगळे.
येना लवकर."

प्रपोज १३
"बाबांनी एक स्थळ आणलय.
मुलगा युएस चा आहे."

प्रपोज १४
"मी तुला गुंतवलं?
मी पहील्यापासूनच क्लियर होते
बाबा आणि ताईच्या अगेंस्ट जाणार नाही म्हणून.
माझ्या जागी दुसरी कुणी असती तर ...
विचार तरी केला असता का तुझा?"

प्रपोज १५
"खुप छान वाटतं रे तुझ्या कुशीत
असं वाटतं अशीच रहावी ही मिठी.
पण आपण हे थांबवायला हवं...
उद्या माझ्या होणा-या नव-याला
मी कसं सामोरं जाऊ?
सांगते ते ऐक न प्लिज
तू पण लग्न कर...
मिळेल तुला माझ्याहून छान बायको
मी शोधू का?"

19 comments:

  1. सहीच... लिहित रहा.

    ReplyDelete
  2. फेसबुक - ट्विटर वर सगळ्यांना कळवायलाच पाहिजे हा ब्लॉग.... शुभकार्यास विलंब नको... आत्ता शेअर करतो!

    ReplyDelete
  3. फारच छान. प्रपोज १३ तर खूप आवडला , एकदम टोचून बोलण

    ReplyDelete
  4. प्रथमच वाचत आहे तुमचा ब्लोग.
    छान कविता करता.
    आवडली ही कविता.

    ReplyDelete
  5. रच्याक... भारी... लफड्याची लाईफ सायकल...
    Thanks to भुंगा for sharing link...

    ReplyDelete
  6. chan ahet kavita....lihit raha....! amhala ashich mejwani det raha....!

    Swati Purandare

    ReplyDelete
  7. Propose 16:- Tuza kahitari gairsamaj zala ahe, Mi kadhihi tula ashi swapne dakhavali navhati.
    :)

    ReplyDelete
  8. झ** लिहीता हो तुम्ही!
    :)

    ReplyDelete
  9. mastach sagale prapoj ej se badhkar ek aahe ...!!

    santosh narvekar

    ReplyDelete
  10. संकलित केलंय स्वतःसाठी, आपली हरकत नसावी. ;)

    ReplyDelete
  11. लै भारी, प्रत्येक डायलॉग ऐकलाय महाराज ह्याच्यातला मी, सुक्ष्म अवलोकन आहे तुमचे, लिखते रहें.... बोहोत खुब

    ReplyDelete
  12. Pahilyadi vachatoy tumachyaa kavita... apratim !!! bintod !!! thanx to hemant rajopadhye

    ReplyDelete
  13. Just wandered here from Alhad's blog...
    I loved it Profound + Comic..I heard almost alll those replies at one point or another n ofcourse Propose 12 is my favourite :)

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...