Thursday, January 13, 2011

तो ६० इंचाचा माणूस


तो ६० इंचाचा
मा
णू

त्याने १०००
स्के अ र फ़ु ट
घ र
घे त लं

सोबत म्हणून
१ एकरचं
फ़ार्महाऊस


१२०
इं
चा
ची
कार
घेतली

तो पेग लार्ज घ्यायचा
त्याच्या हॅबीट्सही स्ट्रॉंग.
त्याचा टीव्ही ३२ इंची
फ्रिज ३०० लिटर्स
त्यानं त्याच्या लग्नात
बायकोच्या १० इंची

ळ्या

२८ इंची
मं


सू
त्र
घातलं
त्याची बायको मग त्याच्या घरी
आपलं घर म्हणून राहू लागली

तो बुटका वाटायचा पण
कपडे-परफ़्यूम ऊंची वापरायचा
त्यानं पडलेले दात सोन्यानं घडवले
त्याचं ऑफ़िस अर्ध्या तासावर
पण तो वर्ल्डटूर करून आला
त्याचं वाचन कमी
पण पुस्तकं जाडजूड घ्यायचा
पार्टी दिली तर जंगीच द्यायचा
एकदा तो त्याच्या
४ बाय ५ च्या
बा
थ रू

मधे
पारू

पडला आणि मेला


त्याची बायको माणसं पाहून
धाय मोकलून
रडली...
त्याची मुलं
आईलाआधारदेतम्हणाली
"जे व्हायचं होतं ते झालं"

त्याचे
ना
तू
मोठे
झा
ले
तेव्हा त्यांना आपल्य़ा
आजोबांनी
जन्मभर काय केलं?
असले प्रश्न पडले नाहीत.
त्याच्या नातवांनी
त्या ६० इंचाच्या
मा

सा
ची
त्याच्याच घरातली
१२ बाय ८ इंचाची तसबीर...
ह जा रो कि लो मी ट र्स लां बी च्या
पाणी
अटलेल्या
नदीत
सो डू न दि ली.

8 comments:

 1. च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च
  क्लास ग्रेट बाप अशक्य

  शब्दच नाहीत!


  पुलेशु

  -आल्हाद

  ReplyDelete
 2. Ultimate !
  मी तुमची एक कविता वाचली आणि नंतर आधाशासारखा वाचतच गेलो. वाचनानंदासोबतच जाणिवा अस्वस्थ आणि त्याच बरोबर समृद्ध करणारा हा अनुभव दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.

  ReplyDelete
 3. जबराट...! कमाल...! अफाट...!

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...