Friday, January 07, 2011

डोळे

एकीचे डोळे: उगाचच हसरे.
मोहक पण स्वतःचे नसलेले
एकीचे डोळे: अगदी अबोल.
कुणी कुणाचे नसल्यागत
एकीचे डोळे: एकामागुन एक एकामागुन एक
प्रश्न घेऊन बसलेले
एकीचे डोळे: तजेल बिनधस्त आरपार
"घे टिपून" म्हणणारे

एकीचे डोळे: आखिव रेखिव सजग
शरीरासकट हलणारे
काहीतरी जाणवूनही
जाणवू न देणारे

एकीचे डोळे: हताश
आयुष्य हरवल्यासारखे

एकीचे डोळे: चुकार
बघायला लावूनही
पश्चातःप करून देणारे

एकीचे डोळे: आपल्यासारखेच
आपल्या भाषेत बोलणारे
म्हणून... रोज रोज अर्थांची वर्तुळे
रुं दा व त नेणारे
एकीचे डोळे: तिरळे.
आपलं काय
चूकतयच्या
भव-यात पडलेले
एकीचे डोळे: काळोखाचे.
उजाडणं-मावळणंच्या खेळापासून दूर
रस्त्याच्या या टोकापासून...
त्या टोकापर्यंतच्या प्रवासात
नसलेल्या दृष्टीत
प्राण टाकू पाहणारे
मा झे डो ळे: प्रत्येक डोळे आवर्जून पहात
दृष्टीआड करणारे

4 comments:

 1. आणि कदाचित एकीचे 'मिटलेले डोळे' ही!! ते फक्त राहून गेले अस वाटला!
  :-)

  ReplyDelete
 2. ओह... कदाचित मी पोहचलो नाहीये तिथे. आवडलं आणि त्रासही.

  ReplyDelete
 3. टीका करण्याचा हेतू नव्हता. कवीला काय भावत आणि ते त्याने/तिने कस व्यक्त कराव ..कराव की नाही .. याबाबत प्रत्येक व्यक्ती वेगळी असते! सहज गंमत म्हणून मी लिहील होत! म्हणून ':-)' चिन्हही टाकल होत! असो.

  ReplyDelete
 4. नाही नाही. मी अजिबातच टीकेच्या अंगाने नाही घेतलाय, उलट तुम्ही म्हणताय ती बाजूही जास्त समर्पक ठरू शकली असती अस वाटलं मला. म्हणून तुम्ही गमतीने म्हंटल तरी मला ते सिरीयस घ्यावसं वाटलं.

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...