Wednesday, January 12, 2011

काळ

तोच सुर्य तोच चंद्र
तरी काळ बदलल्याच
जो तो म्हणत होता


मनं अधिक निरगट्ट आणि यंत्रे भलतीच
सेंसिटिव्ह झाली

स्वातंत्र्यसैनिक म्हणाले;
"स्वातंत्र्यानंतर खुपच मरगळ आली आयुष्याला"

टिव्हीमुळे फावला वेळच मिळत नसल्याचं
गृहिणी म्हणाल्या.

बहूसंख्यने लोक हळूहळू एकटे पडले

मसल पॉवर वाढलेल्या माणसांच्या भावना
वरचे वर दुखू लागल्या

स्थानिकांचा कल पाहून मल्टीनॅशनल कंपन्यांनी
गोमुत्रापासून दारूनिर्मिती केली

बघता बघता सगळे इतके मॅच्यूअर्ड झाले की
आध्यात्मावर कॉमेडी करू लागले

बाजारपेठा इतक्या विस्तारल्या की
औषधांपासून उपदेशांपर्यंतचे सगळे डोस
गरजांनुसार उपलब्ध झाले

खुल्या अर्थ व्यवस्थेत पैशाला
कुठं थांबावं कळेना झालं

विकासाच्या मुद्द्यावर राजकारणी मोडतोड करू लागले
आणि क्रांतिची वाट पहात समाज
कंटाळून झोपी गेला

सरते शेवटी जाणिवा बोथट झाल्याचं
सगळ्यांनाच ठळकपणे जाणवत राहिलं

6 comments:

 1. "मनं अधिक निरगट्ट आणि यंत्रे भलतीच
  सेंसिटिव्ह झाली". Very true..

  ReplyDelete
 2. बराच विरोधाभास जाणवतो तो मांडलाय. आभारी.

  ReplyDelete
 3. ग्रेट . एकदम नवी एकदम unique style . कमलेश, तू पक्का समकालीन लेखक आहेस यार .
  मला अचानक म्हातारं झाल्या गत वाटू लागलं .

  ReplyDelete
 4. अरुण म्हात्रेसर तुम्ही कायम तरुणच आहात आणि रहालही. प्रतिक्रियेबद्दल आभारी.

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...