Saturday, May 01, 2010

हळद


हळद लावली जाईल
जेंव्हा अंगावरती तुझ्या
अश्रु येतील घरंगाळोनी
जखमेवरती माझ्या
अधिकच अल्लड सलज्ज होउन
काढशील तू मेहेंदी
आणि इथे मी असेल बसलो
हरवून माझी धुंदी
मला न ठाउक तेंव्हा तुजला
आठवेन मी किती
परी इथे गं माळ तोड़तील
डोळ्यांमधले मोती

तुला वाटले असेल आता
भेटलोच का आपण ?
जे जे झाले ते ते सारे
कशास केले आपण ?

माझ्यासाठी तुझी आठवण
जन्मभराचा असेल खेळ
तूच सांगना मरेस्तोवरी
पुरेल का गं मजला वेळ ?

: कमलेश

3 comments:

 1. माझ्यासाठी तुझी आठवण
  जन्मभराचा असेल खेळ
  तूच सांगना मरेस्तोवरी
  पुरेल का गं मजला वेळ ?


  बापरे!

  फक्त तो मी किती चा प्रकार डोक्यावरून गेला.

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...