Wednesday, February 02, 2011

अर्धी कविता

अर्धी कविता घेऊन
आलो घाई घाई
म्हंटले; "असू दे उद्यास
थोडी शिल्लक शाई"

अर्धी कविता भींतीवर
चिकटवली काल
अर्ध्या कवितेवर
चूकचूकली अवघी पाल

आता न ठावे कुठे
मिळावी कविता उरली
बघता बघता
पेनामधली शाईपण विरली

2 comments:

 1. Kamlesh, very good morning,
  tumacha blog vachala, kavita khup chan karata tumhi. very nice ,lihit raha... tumhala khup khup shubheccha.

  ReplyDelete
 2. अर्ध्या कवितेचा शोध ..
  अस बहुधा सगळ्याच कवींच होत का?
  माहिती नाही

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...