Friday, November 02, 2012

तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची


तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची

एका ओळीत गर्दी करून असायचे शब्द श्वासांसोबत 

उभा जन्म भरून पावायाचा
शब्दांतून रितं होत जाताना

नि वाटायचं सगळ्या जगाला आपण देत आहोत मंत्र
सुखी होण्याचा

तेव्हा रोज व्हायचीच
सकाळ दुपार संध्याकाळ रात्र

तेव्हा असायचे
उन वारा पाउस थंडी

तेव्हा दिसायचे रंग
काळे-पांढरे गडद-फिके

तेव्हा कळायचे नाहीत कशाचेच नेमके अर्थ

तेव्हा किती सहज व्हायचे अर्थाचे अनर्थ

पण तेव्हा वाटायचं नाही काहीच व्यर्थ
आत्तासारखं

2 comments:

  1. हं! दिवस तसेही असतात आणि असेही :-)

    ReplyDelete
  2. मस्त. आता लोक तुम्हाला सल्ला देणार, 'एवढा विचार कशाला करता चायला?'

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...