Monday, November 08, 2010

प्रेम

तिच्या कॉस्मॅटिक अदांवर
मी करत राहिलो
आयुर्वेदिक प्रेम

मला जाणवायचं
तिचं प्लॅस्टिक स्माईल
पण साला माझा रागही
इकोफ्रेंडली

कॅटबरी, केक्स, गिफ्ट्स मधून ती
जपू पहायची नाँनस्टीक नातं

आणि तरीही मी
राखायचो निगा
तिनं दिलेल्या एकेक
जखमेची- अश्रुंची
रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी....

: कमलेश

3 comments:

 1. हा हा हा
  मस्त जमलेली आहे कविता...
  "आणि तरीही मी
  राखायचो निगा
  तिनं दिलेल्या एकेक
  जखमेची- अश्रुंची
  रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी...."
  अप्रतिम.........

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...