Friday, November 18, 2011

तोवर

तू अन् मी
मध्ये वगैरे वगैरे.
दोघांचेही तळहात एकमेकांवर जुळवत राहायचो आपण
पण जुळायचे नाहीत कधी.
दरम्यान स्पर्श होत राहिले.
चुटपुटते किंवा घट्ट
पत्रिका, भविष्य, तळहातांच्या रेषा
न बघताच आपण तुटत गेलो एकमेकांपासून
तेही फार बरं झालं.
हा अखंड श्वास मरेपर्यंत
कुणाच्या तरी नावावर लिहिला जाऊ शकतो
कुठल्याही हेतुशिवाय.
हे माहितीच नव्हतं मला तोवर.

1 comment:

  1. पर्फेक्ट पोचल्या भावना.
    डोळे ओलावले, ते मात्र वैयक्तिक .........

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...